देवेंद्र फडणवीसांच्या “विनाशकाले विपरीत बुद्धिला” आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची ही युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेने ही युती महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी केल्याचे सांगितले.

त्यांच्या युतीवर भाजप (BJP) आणि शिंदे गटातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेच्या या निर्णयाला ‘विनाशकाले विपरिक बुद्धी’ असे म्हंटले आहे.

त्यावर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी त्यांच्या या टीकेवर भाजपवर प्रतिटीका केली आहे. आदित्य ठाकरे आज नागपूरात आहेत. ते प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधत होते.

शिवसेनेने तिची कोणतीही भुमिका कुठेही सोडलेली नाही. शिवसेनेची भुमिका कायम स्पष्ट राहिली आहे. ज्यांना आमची भुमिका आणि मते पटली ते आमच्यासोबत येतील, असे ठाकरे म्हणाले.

गेल्या अडीच वर्षात देखील आम्ही महाविकास आघाडीच्या (MVA) निमित्ताने एकत्र आलो होतो, आणि सोबत राहिलो आहोत. ज्यांना आमची भुमिका मान्य आहे, ते सोबत राहतील आणि ज्यांना नाही पटणार ते जातील, असे ठाकरे म्हणाले.

शुक्रवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आपण सगळे शिवप्रेमी आहोत त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत.

महाराष्ट्राला दुहिचा श्राप आहे. त्या श्रापामुळे आपल्या राज्याचे नाव खराब झाले आहे. आपण हा दुहिचा श्राप गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवूया, असे म्हणत ठाकरेंनी युतीचे स्वागत केले.

महत्वाच्या बातम्या – 

‘संभाजीराजेंचं नेतृत्व नको’; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मोठी बातमी! पाकिस्तानने जाहीर केली राष्ट्रीय आणीबाणी; तीस लाख लोक बेघर

पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकांत…”

नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; अमेरिकेचे सर्वेक्षण

निवडणूक आयोगाचा शिवसेनेला मोठा दिलासा