जलसंधारण मंत्र्याच्या गाडीने तरुणाला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर : सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीचा अपघाता झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्याता आली आहे. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडवलं. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातामुळे संपूर्ण सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांआधी हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघाता झाला होता. या अपघातामध्ये 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता.

जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे.

भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.

श्याम होळे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृत तरुण हा बार्शीतील शेलगाव होळे गावातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांकडू देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-