सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिर खानच्या मुलीनं दिली इंटर्नशीपची संधी, महिन्याला मिळणार ‘एवढा’ पगार

मुंबई| बाॅलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सध्या खूप चर्चेत आहे. त्याचबरोबर इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. यातच ती आता पून्हा एका कारणासाठी चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी इरा खाननं एक व्हिडीओ शेअर करत ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने तिने मानसिक स्वास्थ सगळ्यांसाठी किती महत्त्वाच असतं या बद्दल सांगितलं होत. आता इराने एक पोस्ट शेअर करत या गोष्टीला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

इरा खान लोकांना मानसिक संतुलनाविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहे. याच कामासाठी इराला आणखी काही लोकांची गरज आहे. तिनं या कामासाठी काही जागा काढल्या आहेत. त्यासाठी तिला किती कॅंडिडेटची गरज आहे. या बद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने माहिती दिली आहे.

इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करत या बद्दल माहिती दिली आहे. इराने त्या पोस्टमध्ये सांगितले आहे की तिला 25 इनर्टनची गरज आहे. ज्यांना मानसिक स्वास्थमध्ये काम करण्याची आवड आहे ते लोक इथे अप्लाय करू शकतात. त्यांना ती एक महिना काम करण्यासाठी 5 हजार रुपये पगार देणार आहे. इनर्टनला काय काम करावा लागेल हे देखील इराने सांगितलं आहे. त्यांना फक्त फोन आणि ईमेल करावे लागतील. प्रत्येक राज्यातून एक म्हणजेच वेगवेगळ्या भाषेचे लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या भाषेच्या लोकांना मदत करू शकतील.

ira khan

22 मार्च पासून इनर्टनला जॉइन करावं लागेल त्यांची 8 तासाची शिफ्ट असेल. आणि कोणत्या ईमेल आयडीवर सीव्हि पाठवायचा हे देखील इराने त्या पोस्टमध्ये सांगितले आहे. दुसऱ्या स्टोरीमध्ये इराने तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि ती म्हणाली की जर तुम्हाला फ्रीमध्ये दिवसातून एक-दोन तास काम करायचं असेल तरी तुम्ही तुमचा सीव्हि करू शकता. जर तुम्ही मला वैयक्तिकरित्या ओळखता तर मेसेज करून सांगा.

मानसिक आरोग्याशी संबंधित इराची ही पायरी एक छोटीशी सुरुवात असू शकते, परंतु हे निश्चितपणे एखाद्यासाठी फायदेशीर ठरेल. लॉकडाऊनपासून, देशात मानसिक समस्यांना सामोरे जाणाऱ्यांमध्ये लक्षणीय संख्येनं लोक समोर आले आहेत. काही लोक त्यांच्या समस्या उघडपणे सांगत आहेत, तरीही बरेच लोक त्या गोष्टी शेअर करण्यास घाबरतात.

महत्वाच्या बातम्या – 

‘राष्ट्रपती लागवट लागू करा’ असं म्हणाऱ्यांवर…

‘या’ कारणामुळे जोडप्यानं आपल्या शेजाऱ्यांना…

‘काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून…

आज सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…

जुलियो रिबेरोंनी शरद पवारांचा ‘हा’ प्रस्ताव…