आमीरच्या लेकीचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. इराने अभिनयापेक्षा दिग्दर्शनाला पसंती दिली. सध्या ती मालिकांचं दिग्दर्शन करण्यात व्यग्र आहे. याशिवाय ती मॉडेलिंगमध्येही आपलं नशीब आजमावत आहे. इरा सोशल मीडियावर सक्रिय असून स्वतःचे लेटेस्ट फोटो ती सतत शेअर करत असते.

नुकतंच इराने एक फोटोशूट केलं आहे. यातलेच काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इरा फारच बोल्ड दिसत आहे. तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून ती कोणत्याही अभिनेत्रीला हॉटनेसमध्ये मात देऊ शकते यावर कोणीही शंका घेणार नाही.

फोटोत इराने गडद मेकअपसोबत लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. ‘सॅटरडे नाइट वाइब’ असं इराने फोटो शेअर करताना लिहीलं आहे. इराने आधीच सांगितलं आहे की तिला अभिनयात फारसं स्वारस्य नाही. तिला दिग्दर्शनामध्ये तिला करिअर करायचं आहे. याआधी तिने नाटकाच्या निर्मात्या सारिकासह फोटो शेअर केला होता.

‘हा पाऊस कधी थांबावा असं मला कधीच वाटत नाही. आम्ही जेव्हाही सराव करतो तेव्हा पाऊस पडतो. पण माझी निर्माती मला कधीच पाऊसात चालू देत नाही. यावेळी मी त्यांना माझ्यासोबत यायला कसंतरी करून मनवलं.’ असं इराने पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे.

इरा ज्या नाटकाचं दिग्दर्शक करणार आहे ते ग्रीकमधील एका पौराणिक कथेवर आधारित आहे. यूरिपिड्स मेडिया असं या नाटकाचं नाव आहे. या नाटकात इरा युवराज सिंगची पत्नी हेजल कीच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-