आरेसंबंधी मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत; आदित्य ठाकरेंचा बाण

मुंबई |  शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे. ‘आरे’ला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही, अशी स्पष्ट शिवसेनेने घेतली आहे. मात्र आरेसंबंधी काही जणांचे गैरसमज झाले आहेत. त्यांचे गैरसमज आम्ही दूर करू, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. आज मात्र आदित्य ठाकरे यांनी आरेसंबंधी मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केला आहे.

मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. जनआशीर्वाद यात्रा आज अंबरनाथमध्ये होती. यावेळी आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाणारच्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करू, असं म्हटलं आहे. त्यावर स्थानिकांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल, असं सूचक वक्तव्य आदित्य यांनी केलं आहे.

नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प आणण्याचा फेरविचार आम्ही करत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी कोकणात म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आरे’ आणि ‘नाणार’ या प्रमुख मुद्द्यांवर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-