मुंबई | आरे आंदोलनावरील नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसंच मेट्रोच्या कुठल्याही कामाला मी स्थगिती दिलेली नाही. मी मेट्रो कारशेडला स्थगिती दिली असल्याचा पुनरूच्चार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आपण कोणत्याही विकासकामाच्या विरोधात नसून विकास कामांना स्थगिती दिली नाही. मेट्रोचे काम सुरू असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. आरेतील एक पानही तोडणार नसल्याचं त्यांनी सांगत कारशेडबाबत पर्यायांचा विचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वागत केलं आहे. त्यांनी आज सकाळीच ट्वीट करत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मोकळ्या मनानं मदत करावी- उद्धव ठाकरे – https://t.co/onDOxPblC6 @uddhavthackeray @ShivSena @narendramodi @BJP4Maharashtra #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
“…तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला महत्त्व असतं” – https://t.co/Q2h4om41YK @EknathKhadseBJP @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra