पंकजा मुंडे भाजप सोडणार???; त्यांच्या समर्थक आमदाराचा मोठा खुलासा

बीड | विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंनी आज प्रथमच फेसबुकवर  भावनिक पोस्ट केली आहे. पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या पोस्टमुळं राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र पंकजा मुंडे यांचे मानलेेले भाऊ विधानपरिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी या वृत्ताचं खंडण करत चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

पंकजाताई या कुठेही जाणार नाही. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. सोशल मीडियावर काहीही अफवा पसरवल्या जात आहेत. विधानसभा निकालानंतर त्या शांत आहेत हे खरं असलं तरी त्या लवकरच सक्रिय होतील, असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आगामी काळात पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार आहे, अशी भावनिक पोस्ट पंकजा मुंडे सकाळी नऊच्या सुमारास केली होती.

दरम्यान येत्या 12 तारखेला पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर कोणता निर्णय घेणार?, काय बोलणार?, याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-