मुंबई | महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक भरती पात्रता परीक्षेत (टीईटी) प्रकरणाची मागील सहा महिन्यात मोठी चर्चा सुरु होती. त्यात तुकाराम सुपे (Tukaram Supe) याला आणि अनेक संबंधितांना अटक झाली होतीय.
आता याप्रकरणी मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शिक्षक पात्रता घोटाळ्याचे धागेदोरे थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले आहेत. परीक्षेत अवैध गुण मिळवून पात्र होण्यासाठी उमेदवारांनी सुपे याला लाच दिली होती.
तुकराम सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र झाल्याचे प्रमाणपत्र देखील मिळाले नव्हते. या उमेदवारांंमध्ये आता शिवसेनेचे बंडखोर नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन कन्यांचा देखील समावेश आहे.
खुद्द माजी मंत्र्यांच्या मुलीच जर अशा स्वरुपाच्या गैरव्यवहारात आणि घोटाळ्यात सामील असल्याने चर्चांना उधाण आले आहे. हिना आणि उजमा यांचा या प्रकरणात समावेश आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे.
सत्तारांच्या हिना आणि उजमा या दोनही शिक्षिका मुली 2020 साली अपात्र ठरल्या आहेत. सायबर पोलीस (Cyber Police) आणि परीक्षा परिषद (Teacher Elegibility Test) यांनी अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यात या दोघींची नावे आहेत.
या दोघींनी कोणत्या दलालाला पैसे दिले, ते अद्याप कळायचे आहे. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये (Sillod) सात शैक्षणिक संस्था असून त्यात या त्यांच्या दोन मुली सेवारत आहेत.
सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी नुकतीच औरंगाबाद शहरातील अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा कौसर अब्दुल सत्तार शेख यांची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न
“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”
“उद्धव ठाकरेंसोबत असताना शिंदे शिस्तीत वागायचे, पण आता…”
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं; शिंदेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत
बिग बॉस मराठी 4 होस्ट करण्याबाबत महेश मांजरेकरांचा खुलासा!