“प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटलं”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल (दि. 07) रोजी दिल्लीत निती आयोगाची (NITI Aayog) बैठक घेतली. यावेळी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री आणि महत्वाचे उच्च पदस्थ नेते यांनी या बैठकीला उपस्थित होते.

याप्रसंगी काढलेल्या समूह फोटोची आती सर्वत्र चर्चा होत आहे. या फोटोत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अगदी शेवटच्या रांगेत उभे आहेत. यात एकनाथ शिंदे यांचा फक्त चेहरा जेमतेम दिसत आहे.

त्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर (MVA) टीका केलीये. एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शेवटच्या रांगेत स्थान मिळाले आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.

‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा, ज्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा (Chatrapati Shivaji Maharaj) स्वाभिमान जेथे उफाळून आला तो आग्रा दरबार (उ. प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखाविणारा फोटो. शिंदे साहेब वाईट वाटले, असे ट्विट अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले.

एकनाथ शिंदे यांचा शेवटच्या रांगेतील फोटो सध्या खूप गाजतो आहे. आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व शेवटच्या रांगेत उभे राहून केले.

विरोधकांच्या टीकांवर आता भाजप आणि त्यांचे नेते सारवासारव करत आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. आणि विरोधकांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राजकारणासाठी राजकरण करण्यात काही अर्थ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून दिल्लीत महाराष्ट्राचा मानसन्मान वाढला आहे, असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

ज्यावेळी राष्ट्रपतींचा शपथविधी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पहिल्या रांगेत बसले होते. हे विसरुन चालणार नाही, असे सामंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न

“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”

“उद्धव ठाकरेंसोबत असताना शिंदे शिस्तीत वागायचे, पण आता…”

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं; शिंदेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत