मी इंटिमेट सीन्स सर्वांसमोर शूट केले, पण मला…; जॅकी श्रॉफ यांचा शुटींगबद्दल खुलासा

मुंबई | चित्रपट सृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. गेली कित्येक दशके प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ. जॅकी श्रॉफ यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना जणू भुरळ घातली आहे.

बॉलिवूडमध्ये भिडू म्हणून ओळखले जाणारे जॅकी श्रॉफ नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही काळ ते चित्रपट सृष्टीपासून लांब होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा मनोरंजन विश्वात कमबॅक केलं आहे.

जॅकी श्रॉफ आता ‘द इंटरव्यू: नाईट ऑफ 26/11’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. तसेेच यामध्ये त्यांनी काही इंटिमेट सीन्स देखील दिले आहेत. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी या सीन्सविषयी सांगितलं आहे.

याबद्दल बोलताना ते म्हणाले की, इंटिमेट सीन्स ज्यावेळी मी शूट करत असतो त्यावेळी मला प्रचंड भिती वाटत असते. चित्रपटात जेव्हा मी हा सीन शूट करत होतो तेव्हा मला खूप लाज वाटत होती. परंतु एक अभिनेता म्हणून मला हे करावं लागलं.

तसेच तुम्हाला कॅमेऱ्यावर अनेकजण पाहत असतात. हे सीन करताना टीममधील अनेकजण तिथे उपस्थित असतात. साहजिकच हे सीन सर्वांसमोर करताना लाज वाटणार. परंतु तुमच्या कामाचा भाग असल्यामुळे तुम्हाला ते करावे लागते, असे देखील यावेळी जॅकी श्रॉफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जॅकी श्रॉफ यांचा ‘द इंटरव्यू: नाईट ऑफ 26/11’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डच फिल्म ‘द इंटरव्यू’ चा रिमेक आहे.

महत्वाच्या बातम्या –

“अभिनेत्रींना कीस करुन मला कंटाळा आलाय, ‘सिरीअल किसर’ ही ओळख मला नकोय”

…म्हणून मी लग्नाअगोदर गरोदर असल्याचं लपवलं होतं; नेहा धुपियाने केला खुलासा

‘बिग बाॅस ओटीटी’: बोलता बोलता शमिता राकेशला म्हणाली “इथे ये आणि आधी मला एक किस कर”, पाहा व्हिडीओ!

ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याच्या घरावर छापा!

हनी सिंगच्या अडचणींत वाढ; घरगुती हिंसाचार प्रकरणी न्यायालयानं फटकारलं, म्हणाले…