सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा; या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांचे जबाब

मुंबई | आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दर 2 वर्षांनी सुशांत आपल्या मॅनेजरची टीम बदलत होता. ही टीम त्याच्यासोबतच असायची. पोलीस सर्व मैनेजर्सचे जबाब घेत आहेत. त्यांनी दिलेले जबाबाची सत्यता तपासत आहेत. या प्रकरणात पुढे अजूनही तपास सुरु आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आज या प्रकरणात सुशांतची कायदेशीर सल्लागार अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानिचा जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. मात्र, पोलीस ठाण्याबाहेर आल्यानंतर अ‍ॅडव्होकेट प्रियांका यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

यशराज फिल्म्स तर्फे सुशांत सिंह राजपूतसोबत झालेल्या कराराचे कागदपत्र वांद्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. पोलीस या संपूर्ण कागदपत्रांचा बारकाईने तपास करत आहे. पोलिसांनी सुशांतच्या चार्टर्ड अकाऊंटला बोलवलं आहे.

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणाला…