अभिनेत्री कंगना राणैतची सर्वोच्च न्यायालयात धाव, म्हणाली….

सोशल मीडियावर नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौत सध्या कायद्याच्या कचाटय़ात सापडलेली पहायला मिळत आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत व तिची बहिण रंगोली चंदेल या दोघींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आलेले तिन्ही खटले हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात हलवण्यात यावे अशी मागणी कंगनाने केली आहे.

मुंबईत शिवसेनेला तिनं केलेल्या उघड विरोधामुळे ती महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात देखील चर्चेत आली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही सेलिब्रिटी मंडळींविरोधात कंगनाने केलेले काही ट्वीट्स तिच्यासाठी कायदेशीर अडचण निर्माण करणारे ठरले असून यासंदर्भात तिच्याविरोधात मुंबईतल्या वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या आहेत.

शिवसेनेचा माझ्यावर राग असून, त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे माझ्याविरुद्ध मुंबईत सुरू असलेले सर्व खटले सिमला येथील न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी विनंती अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

कंगनाचे ट्विट हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमधील वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरणारे आहे, असा दावा करीत वकील अली काशिफ खान देशमुख यांनी कंगनाविरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे.

त्याचबरोबर प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्या प्रकरणात हजर न राहिल्याने न्यायालयाने कंगनाच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले असून, पुढील सुनावणीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. यातच कंगना राणौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये मुंबईत शिवसेनेकडून आपल्याला धोका असल्यामुळेच आपण ही मागणी करत असल्याचं कंगनानं नमूद केल्याचं सांगितलं जात आहे.

न्याययंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. संबंधित सर्व प्रकरणांमध्ये देशातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्यास तयारी आहे. मात्र मुंबईत जाण्यास आपणास भीती वाटते, असे कंगनाचे म्हणणे आहे.

दरम्यान, गेल्या काही काळात कंगना राणैत प्रचंड वादात होती. कृषी कायद्यावरुन आक्षेपार्ह ट्विट केल्याने तिने वाद ओढावून घेतला होता. याच पार्श्वभूमीवर कंगनाला मंगळकारी कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. शेतकरी आंदोलनाबाबत तिने केलेल्या वादग्रस्त ट्विटसंबंधित खटल्याला स्थगिती देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. कर्नाटकच्या कनिष्ठ न्यायालयाने कंगनाकर गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. हा गुन्हा रद्द करण्याची किनंती कंगनाच्या ककिलांनी केली. मात्र उच्च न्यायालयाने ही किनंती धुडकाकून लावली.

महत्वाच्या बातम्या –

वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहतेय? मग तुमच्या तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मोठी बोतमी! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट, ‘या’ कारणाने वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये धाव

‘सुशांत गेला यात माझी काय चूक आहे’; संतापलेल्या अंकिताचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर! पाहा व्हिडीओ

“भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे माझ्या बापालाच जाऊन विचार”

अखेर पूजा चव्हाणचा पोस्टमॉ.र्टम रिपोर्ट आला समोर; मृ.त्युचं धक्कादायक कारण उघड!