भारतीय संघातील ‘हा’ वेगवान गोलंदाज लवकरच बांधणार लग्नगाठ

या नवीन वर्षात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकलेले पहायला मिळाले. यातच अनेक सेलिब्रिटींनंतर एक भारतीय क्रिकेटपटू लवकरच लग्नबंधात अडकणार असल्याचं समजतयं. भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा विवाहबंधनात अडकण्याची चर्चा असल्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी त्याने अचानक बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे. वैयक्तिक कारणांसाठी बुमराहने माघार घेतली असली तरी आता त्याच्या लग्नाच्या चर्चांना मात्र उधान आलेलं आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा त्याच्या दमदार कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत असतो. आता तो आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. ती गोष्ट म्हणजे त्याच्या लग्नाची. जसप्रीत बुमराह आता लवकरच लग्नगाठ बांधणार असून लग्नाच्या तयारीसाठी त्यानं कसोटी मालिकेतून माघार घेतल्याची माहिती समोर येतेय.

‘मी लग्न करत असल्यानं लग्नाच्या तयारीसाठी मला सुट्टी हवी आहे,’ असं जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला सांगितल्याचं समजयतंय. त्यामुळे आपल्या घातक यॉर्कर्सने जगभरातील दिग्गज फलंदाजांची विकेट घेणाऱ्या बुमराहची विकेट नेमकी कोणी घेतली, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

बुमराह कोणासोबत विवाहबंधनात अडकणार आहे हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह एका आठवड्यातच लग्न करणार आहे. लग्न केव्हा आणि कोठे होणार याची माहिती अजून मिळू शकली नाही. बुमराने अधिकृतपणे आपल्या लग्नाविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. २७ वर्षीय बुमराने वैयक्तिक कारणामुळे या कसोटीतून काही दिवसांपूर्वीच माघार घेतली होती. त्याशिवाय खेळाचा ताण व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याला यापूर्वीच विश्रांती देण्यात आली होती. मात्र आता तो विवाह करण्याची शक्यता असल्याने एकदिवसीय मालिकेतूनसुद्धा माघार घेण्याची चिन्हे दिसत आहेत. १२ ते २० मार्चदरम्यान अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२०, तर २३ ते २८ मार्चदरम्यान पुण्यात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

महत्वाची बातमी –

अभिनेत्री कंगना राणैतची सर्वोच्च न्यायालयात धाव, म्हणाली….

    वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहतेय? मग तुमच्या तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

      मोठी बोतमी! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट, ‘या’ कारणाने वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये धाव

        ‘सुशांत गेला यात माझी काय चूक आहे’; संतापलेल्या अंकिताचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर! पाहा व्हिडीओ

          “भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे माझ्या बापालाच जाऊन विचार”