“…तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवा”

मुंबई | औरंगाबाद शहरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून वाद सुरू आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध दर्शविला आहे.

त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएम सूचक इशारा दिला आहे. महाराणा प्रताप यांना एमआयएमचा विरोध कशासाठी? असा सवाल करत संजय राऊत यांनी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या शौर्याचं, राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रवादाचं प्रतिक आहे, असं म्हटलं आहे.

मोगलांविरूद्ध आणि आक्रमणकर्त्यांविरोधात त्यांची तलवार चालली. त्यांनी हिंदूचे रक्षण केले. हिंदू महिलांना संरक्षण दिलं. हिंदू मंदिरांचं रक्षण केलं, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

जर कोणी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करत असेल तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती.

एक कोटी खर्च करून महाराणा प्रताप यांचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव आहे. शिवसेना आणि त्यासोबतच भाजपने महाराणा प्रतापांच्या पुतळ्यासाठी आग्रही मागणी केली हे.

मात्र, खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध करत ग्रामीण भागातील तरूण तरूणींसाठी सैनिकी शाळा सुरू करावी, असं म्हटलं आहे.  इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्रदेखील दिले आहे.

महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारून काहीही साध्य होणार नाही. सैनिकी शाळा हाच त्यांच्याप्रती खरा आदर आणि सन्मान असेल, असं इम्तियाज जलील यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण

 “राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती” 

”आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार” 

पोलिसांसाठी महत्वाची बातमी; इतकी मोठी पगारकपात होणार