‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला, म्हणाले…

मुंबई | बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे.

राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहतगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला.

बैलगाडा शर्यती बाबत सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती सी टी रविकुमार आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी पार पडली.

राज्य सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी आज युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने राज्यातील बैलगाडा मालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेक वर्षांपासून कोर्टात आणि संसदेत बैलगाडा शर्यत सुरु करावी म्हणून प्रयत्न करणारे शिवजीराव आढळराव पाटलांनी प्रतिक्रीया दिली आहे.

2014 साली शर्यत बंद झाली होती. 7 वर्ष ज्या निर्णयाची वाट बघत होते तो निर्णय कानावर आला, कानावर विश्वास बसत नाहीये असं मत आढळराव पाटलांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे देखील आभार मानले आहेत.

बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Racing) सशर्त परवानगी मिळाली खरी पण याचं श्रेय जनतेने ठरवावं, श्रेय घ्यायला बाकीचे पुढे येतील पण मी मागे राहणार आहे, हे शेतकऱ्यांचं श्रेय आहे, राज्य शासनाचं हे खरं श्रेय आहे, असं म्हणत आढळरावांनी अमोल कोल्हेंना नाव न घेता टोला लगावला आहे.

दरम्यान, बैलांवर अन्याय होतो या कारणाने बैलगाडा शर्यती बंद झाल्या नव्हत्या बैलाचा समावेश पाळीव प्राण्यामध्ये केला या कारणाने पाळीव प्राण्यांना शर्यत किंवा प्रदर्शनात बंदी आहे या कारणारे बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटील ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!

“शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे ठाकरे सरकार चालतंय तोपर्यंत…” 

मोठी बातमी! ठाकरे सरकारला एकाच दिवशी सलग दुसरा झटका 

रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरेंचं ट्विट, म्हणाले…