“शरद पवारसाहेब झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत”

पुणे | रूपाली पाटील-ठोंबरे या अखेर महाविकास आघाडीत आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार आहेत. अगदी कालपर्यंत कळतेय, समजतेय अशा चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी स्वतःच एक सूचक ट्वीट करून ही माहिती दिली.

रूपाली पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार….

आज अखेर त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. रूपाली पाटलांनी आज मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. मुंबई अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. रुपालीताई पाटील ठोंबरे या आक्रमक नेत्या आहेत. त्यांनीही पक्षात प्रवेश केला. त्या मनसेत अतिशय चांगलं काम करत होत्या, असं अजित पवार म्हणाले.

आज त्यांच्यासह दहा महिलांना पक्षात प्रवेश देण्यात आला. मी पक्षप्रवेशाला मी उपस्थित होतो. पुण्यात मोठा मेळावा घेऊ. त्यावेळी इतरांनाही पक्षात प्रवेश देऊ, असं अजित पवार म्हणाले.

रुपाली ताईंची कामाची पद्धत चांगली आहे. त्यांचं काम पुणे शहराला माहीत आहे. त्यांचा नाव लौकीक आहे. हातात घेतलेलं कोणतंही काम त्या तडीस नेतात. त्यांच्या प्रवेशामुळे शहरात-जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी मदत होणार आहे. त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे. त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पक्षातील अंतर्गत वादामुळे रूपाली पाटलांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर त्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते.

दरम्यान, रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिला असल्याचं बोललं जात होतं. अशात रूपाली पाटील ठोंबरेंनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलंय. पक्षातील काही रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला, म्हणाले… 

महाराष्ट्रात पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटील ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!

“शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे ठाकरे सरकार चालतंय तोपर्यंत…” 

मोठी बातमी! ठाकरे सरकारला एकाच दिवशी सलग दुसरा झटका