“शिवसेेनेनं आढळरावांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला असेल तर…”

पुणे | तीन पक्षाचं सरकार म्हणून राज्यात महाविकास आघाडी सरकारला अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. तीन्ही पक्षात आपापसात देखील मतभेद आहेत.

काही मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादी, तर काही मतदारसंघात शिवसेना-काॅंग्रेस असा संघर्ष होतो. अशात आता परत एकदा शिरूर मतदारसंघातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुणे दौऱ्यावर असताना शिरूर मतदारसंघात मोठी सभा घेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना इशारा दिला होता.

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत जाणार आहेत, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता. महाविकास आघाडीत शिरूर शिवसेनेकडं राहाणार असं देखील राऊत म्हणाले होते.

राऊतांच्या या वक्तव्यावर शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत आणि पाटील हे मोठे नेते आहेत, असं कोल्हे म्हणाले आहेत.

राऊतांच्या वक्तव्याकडं पाहील तर असं वाटत की शिवसेेनेनं आढळराव पाटील यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय. संसदेत जाण्याचे अनेक मार्ग आहेत, असं कोल्हे म्हणाले आहेत.

2024 ला काय होणार हे 2022 मध्ये नाही सांगता येणार ते तर मायबाप जनता ठरवते, असंही कोल्हे म्हणाले आहेत. कोल्हेंच्या वक्तव्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘त्या’ लेटरबॉम्बवर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं’; दिग्गज नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

‘सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा’; भुजबळांचा टोला नेमका कुणाला?

 “14 तारखेला अनेकांचा…”; ठाकरेंचा ठाकरे शैलीत विरोधकांना इशारा

 “आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडणार” चंद्रकांत पाटील भडकले