‘ती’ म्हणते; आदित्य ठाकरे येतील आणि आमचा प्रश्न लगोलग सुटेल… असं आम्हाला वाटलं नव्हतं!

अहमदनगर | युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद दौऱ्याला जळगावमधून सुरूवात होऊन सोमवारी ही यात्रा नगरमध्ये पोहचली. यावेळी महाविद्यालयीन युवक-युवती आणि आदित्य ठाकरे यांच्यात खुमासदार संवाद रंगला. 

कार्यक्रम चालू असताना श्रद्धा तापकीर नावाच्या विद्यार्थीनेने राधाबाई काळे महिला महाविद्यालयाबाहेर झालेली कचराकुंडी, हॉटेलचं टाकाऊ पदार्थ आणि यासगळ्यांमुळे कुत्र्यांचं वाढलेलं प्रमाण.. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न… अशी तक्रार मांडली.

यावर आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री माझ्यासोबत आहेत. पुढच्या काही तासात हा विषय मी मार्गी लावतो, असं आश्वासन यावेळी दिलं. पण फक्त आश्वासन देऊन आदित्य थांबले नाहीत. तर त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर लगोलग संबंधित महाविदयालयात हजेरी लावली आणि त्या भागाची पहाणी करून अधिकाऱ्यांना आदेश दिला.

खुद्द ठाकरेंचाच आदेश म्हटल्यावर अधिकारीसुद्धा झटकून कामाला लागले. आणि पुढच्या 20 मिनीटांत महाविद्यालयाच्या प्रांगणता जेसीबी दाखल झाला. 

यावर आदित्य ठाकरे येतील आणि आमचा प्रश्न लगोलग मार्गी लागेल… असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया श्रद्धा तापकीर हिने दिली.

दरम्यान, आदित्य संवाद या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी जोरदार बँटींग करत तुफान फटकेबाजी केली आणि उपस्थितांच्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवल्या.

महत्वाच्या बातम्या-

-हिमा दासने केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल रिषभ पंत म्हणतो…

-मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी बसवला पुतळा!

-…नाहीतर भाजपचाच काँग्रेस होईल; चंद्रकांत पाटलांचा काळजीचा सूर

-बीडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला झटका; हे दोन महत्वाचे नेते करणार वंचितमध्ये प्रवेश??

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना आता खावी लागणार जेलची हवा!