‘संभाजीराजेंचं नेतृत्व नको’; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मुंबई | गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा प्रलंबित आहे. त्यावर अनेक राजकारणे आणि सुनावण्या पार पडल्या. मराठ्यांना एकदा आरक्षण देखील मिळाले होते. परंतु त्यात तांत्रिक त्रुटी असल्याने ते रद्द केले गेले.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) हे सातत्याने आपली भुमिका मांडत आहेत. शुक्रवारी रात्री या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil), अर्जून खोतकर (Arjun Khotkar), संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे नेते उपस्थित होते.

यावेळी मराठा क्रांती मोर्च्यांच्या लोकांना बोलयला दिले नाही, अशी तक्रार क्रांती मोर्चांने केली. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या पहिल्या फळीतील लोकच आपली मते आणि भूमिका मांडत होते, असे देखील क्रांतीचे लोक म्हणाले.

यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना देखील बोलण्याची संधी मिळाली नाही. तसेच मराठा क्रांती मोर्चाने आम्हाला संभाजीराजेंचे नेतृत्व मान्य नसल्याचे सांगितले. त्यांनी त्यांचे नेतृत्व मान्य नसल्याचा दावा केला.

त्याचबरोबर सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चाच झाली नसल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाने केली. शेवटच्या कार्यकर्त्याला देखील बोलायला दिले गेले पाहिजे, असे मोर्चाचे मत होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांनी आम्हाला संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व मान्य नसल्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे. नेतृत्व करण्याची जबाबदारी यांना कोणी दिली? कोणी सांगितले ते आमचे नेते आहेत?, असा सूर मोर्च्याच्या नेत्यांनी लावला.

तसेच आमचे कोणीही नेतृत्व नाही, हे आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) हेच आमचे नेतृत्व. तुम्ही रात्रीच्या अंधारात बैठका घेता, नेमके चालले काय आहे तुमचे? असा प्रश्न मराठा क्रांती मोर्च्याच्या सम्नवयकांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! पाकिस्तानने जाहीर केली राष्ट्रीय आणीबाणी; तीस लाख लोक बेघर

पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकांत…”

नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; अमेरिकेचे सर्वेक्षण

निवडणूक आयोगाचा शिवसेनेला मोठा दिलासा

‘कोण होतीस तू, काय झालीस…’; गाण्यातून किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघ यांना टोला