“मुख्यमंत्र्यांना एकही गोष्ट माहित नाही, त्यांना पत्रकारांनी ट्रान्सहार्बरबद्दल प्रश्न विचारला आणि…” – आदित्य ठाकरेंची मोठी टीका

रत्नागिरी | राज्यात गेले दोन दिवस वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकारण सुरु आहे. त्यावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात चांगली जुंपली आहे.

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर टीकास्त्र सोडले.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे शिंदे सरकारचे मोठे अपयश आहे. तसेच गेले अडीच – तीन महिने खोके सरकार एकही काम ठळकपणे दाखवू शकले नाही, असे ठाकरे म्हणाले.

मुंबईत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावे 140 मोफत दवाखाने सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, ती मूळ कल्पना उद्धव ठाकरेंची होती. त्याचे बजेट शिवसेनेने दिले आहे.

तुम्ही आमच्यापेक्षा सक्षम आहात, तर मग प्रकल्प हातातून गेलाच कसा, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारसाठी उपस्थित केला. हार के जीतने वाले को बाजीगर कहेते है, लेकीन इथे जीतके हारने वाले को खोके सरकार कहते है, असे देखील ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातून ज्याप्रकारे प्रकल्प गेला त्याप्रकारे इतर राज्यातून जर गेला असता, तर तेथील उद्योग मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला असता, पण आपले मुख्यमंत्री दहीहंडी आणि गणपती मध्ये व्यग्र होते, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी ट्रान्सहार्बर लिंकचे काम पाहण्यासाठी गेले होते. पत्रकारांनी त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारले असता, ते लगेच पेपरमध्ये वाचायला लागले, असा टोला ठाकरेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या –

शिंदे समर्थक आमदाराची काँग्रेस शिवसेनेवर टीका करताना जीभ घसरली; विरोधकांची तुलना केली थेट…

“… तर नोटांवर देखील मोदींचे फोटो छापले असते” अहमदाबादमधील कॉलेजला मोदींच्या नावावरुन वाद

“मी श्रीमती केजरीवाल यांना हात जोडून सांगतो की…”; भाजप खासदारांची केजरीवालांच्या पत्नीला विनंती

मुंबईसह ‘या’ भागांत मोठा पाऊस; पुढील तीन ते चार तास तुफान पावासाची शक्यता

‘हे रात्री बावचळून उठतात आणि….’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी