शिंदे समर्थक आमदाराची काँग्रेस शिवसेनेवर टीका करताना जीभ घसरली; विरोधकांची तुलना केली थेट…

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले आहेत. गेले अनेक दिवस अनेकांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

आता अशाच प्रकारचे एक वादग्रस्त वक्तव्य शिंदे यांचे समर्थक आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ते आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

पत्रकारांनी यावेळी गायकवाड यांना विरोधकांच्या एकजुटीबाबत प्रश्न विचारला. विरोधक आघाडी करुन तुमची राजकीय कोंडी करु शकतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते तुम्हाला लक्ष्य करु शकतात, असे पत्रकार म्हणाले.

या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हिंदीतील डॉयलॉगचा उपयोग केला. पण एका वाक्यात त्यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि महाविकास आघाडीच्य नेत्यांची तूलना तृतीयपंथीयांसोबत (Transgender) केली.

वीरों के दुश्मन होते है, शेरों के दुश्मन होते है, हि** का कोई शत्रू होता है क्या?, असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे आता नवा वाद पेटणार आहे.

त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) सच्चा शिवसैनिक काँग्रेसकडे कधी जाऊच शकत नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक काँग्रेसचे चिन्ह कधीच जवळ करणार नाही. जे गेले ते बाळासाहेबांची औलादच नाही, असे गायकवाड म्हणाले.

संजय गायकवाड यांनी मागे एकदा, शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आली तर त्यांना कोणीही हरवू शकत नाही, असे वक्तव्य केले होेते. पत्रकारांनी यावेळी त्यांना त्यांच्या या वक्तव्याची आठवण करुन दिली.

त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. ते राजकीय स्टेटमेंट होते, असे हसत हसत गायकवाड म्हणाले. यावर पत्रकारांनी त्यांना तुम्ही स्टेंटमेट बदलत आहात, असे म्हंटले.

महत्वाच्या बातम्या –

“… तर नोटांवर देखील मोदींचे फोटो छापले असते” अहमदाबादमधील कॉलेजला मोदींच्या नावावरुन वाद

“मी श्रीमती केजरीवाल यांना हात जोडून सांगतो की…”; भाजप खासदारांची केजरीवालांच्या पत्नीला विनंती

मुंबईसह ‘या’ भागांत मोठा पाऊस; पुढील तीन ते चार तास तुफान पावासाची शक्यता

‘हे रात्री बावचळून उठतात आणि….’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

रामदास आठवलेंची राहूल गांधींच्या “भारत जोडो” यात्रेवर कवितेतून टीका