छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण!

औरंगाबाद | शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, औरंगाबादचे पालक मंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अशा अनेक नेत्यांची उपस्थिती होती.

आज आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आश्वरुढ पुतळा देशातील सर्वाधिक उंच पुतळा आहे. चौथऱ्यासह या पुतळ्याची उंची 52 फूट एवढी आहे. या पुतळ्यामुळे औरंगाबादच्या वैभवात आणखीनच भर पडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रचं प्रेरणास्थान आहे. त्यांचा गौरवशाली इतिहास आजही सर्वांच्या तोडपाठ आहे. त्यामुळे शिवजंयतीला मोठ्या प्रमाणात मावळे जमत असतात. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने शिवजंयती मोकळेपणाने साजरी करता येणार आहे.

अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरं झळाळली आहेत. सर्वंत शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळत आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शिवभक्तांच्या आनंदावर विर्जन पडलं होतं. मात्र यावेळी कोरोना कमी झाल्याने निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन जपला. महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचे श्रेय सर्वार्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…” 

Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले

…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम

“आता कुठं पळणार? मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार”; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

Google वर कधीही ‘काॅल गर्ल’ सर्च करू नका, तुमच्यासोबतही घडू शकतो धक्कादायक प्रकार