“आघाडीचे सर्वेसर्वा खूप हुशार राजकारणी, ते सर्वांना कठपुतळीच्या खेळाप्रमाणे नाचवतात”

मुंबई | महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा हे खूप हुषार राजकारणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ध्यानात येत नाही की, हे सर्वेसर्वा कठपुतळीच्या खेळाप्रमाणे आपल्याला खेळवत आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे सुडाचं राजकारण चालू आहे. क्रिया प्रतिक्रिया चालू आहे. त्यांना जे करायचं ते त्यांनी करावं मग आम्हीही आम्हाला जे करायचं ते करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

ज्या आयटी विभागाला पाच वर्षांची तरतूद 380 कोटींची होती, त्या विभागात पंचवीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा राऊत यांनी केला. एकूणच सर्व संशयास्पद होते व कोणता विषय का काढला जात आहे हे समजत नव्हते. संजय राऊत हे कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालतात. कोणाच्या ते सर्वांना माहिती आहे. त्या इशाऱ्यानुसार राऊत मातोश्रीचा पाया उखडण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा इशारा करणाऱ्यांना आपला मुख्यमंत्री करायचा आहे का, त्यांना संजय राऊत यांना मुख्यमंत्री करायचं आहे का, असे प्रश्न संजय राऊत यांनी अचानक मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीचा विषय पुढे आणल्याने निर्माण झाले आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. तर त्यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत बोलायला हवं होतं, असंही ते म्हणालेत.

सगळ्यांना कुणीतरी अधिकारवाणीने सांगू शकेल अशी अराजकीय व्यक्ती राहिलेली नाही. अशावेळी मुख्यमंत्र्यांची मोठी जबाबदारी असते. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवावं, पण ते कसे बोलावणार?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी ‘मातोश्री’ डळमळीत करायची आहे का? ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सगळ्यांना माहिती आहे. सगळा चिवडा झाला आहे, अशी खोचक टीकाही चंद्रकांतदादांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या- 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…” 

Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले

…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम

“आता कुठं पळणार? मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार”; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट