दसरा मेळावा वाद: युवासेनेचा शिंदे गटाला मोठा इशारा, म्हणाले शिवतीर्थ…

मुंबई | शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला गट म्हणजे खरी शिवसेेना असा दावा केल्यापासून ते शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमावर ते दावा करत आले आहेत.

सालाबादाप्रमाणे शिवसेना दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park, Dadar) मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी करत आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुद्धा तेथेच मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे सांगितले आहे.

दोनही गटांकडून महापालिकेला पत्र गेले असून दोघांचे अर्ज पालिकेच्या विचाराधीन आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर मेळाव्याची परवानगी कोणाला मिळणार यात अजून तरी संभ्रम आहे.

एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्कातच दसरा मेळावा घेण्यासाठी ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून आता पर्यायी मैदान म्हणून वांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सवरील बीकेसी (BKC) मैदानासाठी एमएमआरडीएला (MMRDA) अर्ज दिला आहे.

या वादात आता युवासेनेने (Yuva Sena)उडी घेतली आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन जर शिवाजी पार्कवर मेळावा घेणार असाल, तर रातोरात संपूर्ण शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखरुन टाकू, असा इशारा युवासेनेने दिला आहे.

युवासेनेचे विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांनी याबाबात माहिती दिली आहे. अद्याप शिंदे यांच्या गटाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. परंतु आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –