“अजित पवारांना मुख्यमंत्री करा”, जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री शिंद्यांना काय दिली ऑफर?

मुंबई | राज्यात सध्या शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरु आहे. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सतत टीका करत आहे.

वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पावरुन एकनाथ शिंदे आणि सरकारला घेरले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या कर्तव्यशून्यतेमुळे दोन लाख रोजगार आणि मोठा महसूल निर्माण करणारा प्रकल्प गुजरातने पळविला, असा आरोप विरोधक करत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीत गुजरातेस गेलेला प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे सरकार विरोधात आंदोलन सुरु केले आहे. आणि यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली.

यावेळी सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक ऑफर दिली आहे. तुम्ही अजित पवारांना मुख्यमंत्री करा आम्ही तुम्हाला केंद्रात मोठे पद मिळवून देऊ, असे सुप्रिया सुळे एकनाथ शिंदे यांना म्हणाल्या.

हा राजकारणाचा विषय नाही. हा विषय गंभीर आहे. हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि आर्थिक बाबीचा आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी अंतर्गत राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

तसेच महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असलेला आणि अनेक रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आणि महाराष्ट्रातील मोठी गुंतवणूक परत आणावी असेही आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –

दसरा मेळावा वाद: युवासेनेचा शिंदे गटाला मोठा इशारा, म्हणाले शिवतीर्थ…

फ़ॉक्सकॉन प्रकरणी अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना आरोपांचे पत्र; वाचा सविस्तर पत्र

भाजप आणि मनसे युती होणार का? सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केला खुलासा

बच्चू कडू यांना अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा