फ़ॉक्सकॉन प्रकरणी अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना आरोपांचे पत्र; वाचा सविस्तर पत्र

मुंबई | वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxcoon) ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेली. खरे तर सेमीकंडक्टर तयार करणारी ही कंपनी पुण्यातील तळेगाव येथे स्थापन होणार होती. पण ऐनवेळी ही कंपनी गुजरातला गेली आहे.

त्यामुळे काल (दि. 13) रोजी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सर्वप्रथम या गोष्टीचा खुलासा प्रसारमाध्यमांसोबत केला. त्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आले. आदित्य ठाकरेंनंतर विरोधी पक्षांनी देखील या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे.

आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी या वादात उडी घेतली आहे. अजित पवार यांनी फॉक्सकॉन वेदांता प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एक पत्र लिहिले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांसोबत देखील संवाद साधला आहे.

फॉक्सकॉन प्रकल्प राजकीय दबावातून गुजरातला गेला असल्याचे पवार म्हणाले. गुजरातमधील धोलेरा येथे हा प्रकल्प होणार आहे. पण धोलेरात कोणत्या सुविधाच नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

अजिक पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच यावेळी त्यांनी वेदांताचा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ न देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांंना केली आहे.

या पुणे येथे होणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यात एक ते दीड कोटी रोजगार निर्माण होणार होते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांत या प्रकल्पाची चर्चा केली गेली होती.

पण या कंपनीने सर्व गोष्टी आणि सुविधा तपासून अंतत: या प्रकल्पाला महाराष्ट्रात निश्चिती दिली होती. पण राजकीय दबाव आणि मोदी शहा यांच्यामुळे हा प्रकल्प गुजरातला पळविला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आणि मनसे युती होणार का? सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केला खुलासा

बच्चू कडू यांना अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

वेदांता फॉक्सकॉन गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधानांना फोन, म्हणाले…

उत्तर प्रदेशात भाषणादरम्यान अमित शहांची जीभ घसरली, म्हणाले…