आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत वेगळा गट स्थापन केला व शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी बंडखोरी पाहायला मिळाली. आमदारांपाठोपाठ अनेक आजी-माजी नगरसेवक व खासदारांनीही शिवसेनेकडे पाठ फिरवल्याने शिवसेना दुभंगली.

शिंदे गटाने सुरत, गुवाहाटी, गोवा दौरा करत तत्कालिन महाविकास आघाडी सरकार पाडलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे गट व शिवसेनेतील वाद चिघळला आहे.

सर्वात मोठ्या बंडाळीमुळे शिवसेनेच्या प्रतिष्ठेला मोठा तडा गेला. पक्षाला वाचवण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा सुरू केली असून ते स्वत: जाऊन एकनिष्ठ शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.

आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संभोधित करताना एकनाथ शिंदे व शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेत बंडखोरांनी पाठित खंजीर खुपसला असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

जेव्हा कळालं उद्धव ठाकरेंवर एक नाही तर दोनदा शस्त्रक्रिया झाली ते बेडवरून हलू शकत नाहीत तेव्हाच मुख्यमंत्री होण्यासाठी गडबड सुरू झाली. उद्धव ठाकरे रूग्णालयात असताना मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी गद्दारी केल्याचा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

गेले त्यांच्या रक्तात शिवसेना नव्हती. तो उठाव किंवा बंड नाही तर गद्दारीच होती. गद्दाराचा ठपका घेऊनच ते फिरणार आहेत, असा घणाघातही आदित्य ठाकरेंनी केला.

दरम्यान, शिवसेनेला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तसेच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोजने सोशल मीडियावर आग, चर्चा तर होणारच; पाहा फोटो

‘आयत्या बिळावर नागोबा’, ओबीसी आरक्षणावरून भाजप-शिवसेनेत जुंपली

बंगला, पगार ते सुरक्षा; राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूंना मिळणार ‘या’ सुविधा

अंबादास दानवेंच्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा

“का लोकांची घरं बरबाद करताय चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकाल अन्…”