Top news मनोरंजन

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोजने सोशल मीडियावर आग, चर्चा तर होणारच; पाहा फोटो

ranveer singh e1658461641457
Photo Credit- Twitter/@papermagazine

मुंबई | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या कामाप्रमाणेच त्याच्या हटके फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असतो. रणवीरचे अतरंगी आऊटफिट अनेकदा चाहत्याच्या पसंतीसही उरतात.

बॉलिवूडमध्ये सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत रणवीरचं नाव येतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर रणवीरने बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

अतरंगी कपड्यांमुळे चर्चेच येणारा रणवीर एका मॅगझीनसाठी चक्क न्यूड झाला आहे. एका अमेरिकन मॅगझीनसाठी रणवीरने न्यूड फोटोशूट केलं आहे.

रणवीरच्या या न्यूड फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: आग लावली आहे. पेपर मॅगझीन वेबसाईटच्या कव्हरसाठी रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केलं आहे.

‘रणवीर सिंग: द लास्ट बॉलिवूड सुपरस्टार’ या मथळ्याथखाली पेपर मॅगझीनने रणवीरचे काही फोटोज व माहिती प्रसिद्ध केली आहे. रणवीरने या न्यूड फोटोशूटमध्ये दिलेल्या पोजेस या बर्ट रेनॉल्ड्सच्या कव्हरपासून प्रेरित आहेत.

तसेच पेपर मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने त्याचे चित्रपट आणि फॅशनबद्दल देखील चर्चा केली आहे. शारिरीक रूपाने न्यूड होणं माझ्यासाठी खूप सोप्प आहे पण काही परफॉर्मन्सने मला न्यूड केलं आहे, असं रणवीर म्हणाला.

दरम्यान, या न्यूड फोटोशूटवेळी रणवीरने टर्किश गालिच्यावर वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत. सोशल मीडियावर हे फोटोज प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी रणवीरचं कौतुक केलं आहे. तर न्यूड फोटोंमुळे काही नेटकऱ्यांनी रणवीरला धारेवर देखील धरलं आहे.

पाहा फोटो-

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘आयत्या बिळावर नागोबा’, ओबीसी आरक्षणावरून भाजप-शिवसेनेत जुंपली

बंगला, पगार ते सुरक्षा; राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूंना मिळणार ‘या’ सुविधा

अंबादास दानवेंच्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा

“का लोकांची घरं बरबाद करताय चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकाल अन्…”

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये”