शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?, आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंबई | कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळं गेल्या दीड वर्षांपासून सर्वांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. अशात आता कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे.

जगभरात ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. परिणामी युरोपीयन देशांमध्ये लसीकरणावर भर देण्यासोबत नवे निर्बंध लावण्यात येत आहेत.

देशातील ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येतही वाढ होत असल्यानं सरकारनं पावलं उचलायला सुरूवात केली आहे. देशातील सर्वात जास्त ओमिक्राॅनचे रूग्ण सध्या महाराष्ट्रात आहेत.

राज्यात काही दिवसांपूर्वीच शाळ सुरू करण्यात आल्या आहेत. पण गेल्या दीड वर्षानंतर शाळा सुरू होऊनही ओमिक्राॅनच्या संकाटानं पुन्हा शाळांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ओमिक्रान आणि शाळाबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत. आदित्य ठाकरे यांनी ओमिक्राॅनच्या संकटाबाबत काळजी व्यक्त केली आहे.

सद्यस्थिती गंभीर नसली तरी कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. परिणामी नागरिकांना मास्कचा वापर करणं, हात धुणं, सुरक्षित अंतर राखणं या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

सध्या नाताळमुळं शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. पण पुढे शाळा महाविद्यालयं सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय परिस्थिती पाहून घेण्यात येणार आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे.

मुलांनी दोन वर्ष झालं शाळा पाहिलीच नाही. या गोष्टीचं दु:ख वाटत पण शाळा इतकंच महत्त्वाचं आपलं आरोग्य आहे. परिणामी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला आदित्य ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह उपस्थित होते. विधीमंडळ अधिेवेशनात विधानसभा अध्यक्ष  निवडणुकीवरून वाद सुरू असताना राज्यपाल आणि ठाकरे एकत्र आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

नितेश राणेंना अटक होणार???; पोलिसांच्या हालचालींना वेग

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा