विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात राज्यपाल विरूद्ध सरकार असं चित्र तयार झालं आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही घटनाबाह्य आहे, असं म्हटल्यापासून सरकार आणि त्यांच्यात वाद तयार झाला आहे.

विधानसभा अध्यक्षपदावरून काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यपालांना आम्ही निवडणुकीसाठी परवानगी मागितली आहे पण राज्यपाल चुकीचं वागत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे, तिच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

ठाकरे सरकारनं विधिमंडळात घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल. परिणामी राज्यपालांनी योग्य निर्णय घ्यावा. राज्यपालांच्या निर्णयावर सध्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु राज्यपालांच्या माध्यमातून भाजप जाणीवपूर्वक यात अडथळा आणत आहे. राज्यातील जनता हे बघत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.

भाजपा सरकारनं लोकसभेत तीन वर्षात उपाध्यक्षपदाची निवडणूक घेतलेली नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेला माहीत आहे. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा