कौतुकास्पद! तब्बल नऊ तास प्लँक करून तरूणाने केला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा व्हिडीओ

कॅनबेरा | गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. आता कुठं कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असल्यामुळे, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. परंतू या कोरोना दरम्यान सगळी लोकं आपल्या आरोग्याला जास्त महत्व द्यायला लागली आहेत.

आपल्याला माहित आहे की, कोणतीही एक्सरसाईज सतत करत राहणं सोपी गोष्ट नसते. विशेष म्हणजे एकाच एक्सरसाईज खूप वेळ टिकवणेही जास्त लोकांना जमत नाही. एका ठरावीक लोकांनाच ते जमते. मात्र त्याच्यासाठीही खूप सराव करावा लागतो.

वेट लिफटिंग, रनिंग, स्विमिंग यासारख्या खेळामध्येही सातत्य असेल तरच आपण त्यामध्ये यश संपादन करू शकतो. अनेकांनी वेगेवेगळ्या खेळामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत.

परंतू काय तुम्ही याआधी प्लँक या एक्सरसाईजमध्ये कोणाला वर्ल्ड रेकॉर्ड केला असल्याचं ऐकलं आहे का?. नसेल तर याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका तरूणाने चक्क सलग नऊ तास प्लँक करत वर्ल्ड रेकॉर्डच केला आहे. डेनिअल स्केलि असं नाव असून, तो ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा आहे. हा रेकॉर्ड त्यानं 6 ऑगस्ट 2021रोजी 9 तास 30 मिनिट 1 सेकंद प्लँकच्या पोझिशनमध्ये होता. यापूर्वी हा विक्रम अमेरिकेतील जॉर्ज हूडच्या नावावर होता. त्यानं 20 फेब्रुवारी 2021मध्ये 8 तास 15मिनिटं 15सेकंद प्लँकची पोझिशन घेतली होती.

म्हणजेच डेनिअल जॉर्जपेक्षा एक तास अधिककाळ प्लँकच्या पोझिशनमध्ये होता. डेनिअलचा हा रेकॉर्डची गिनिज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.

तसेच एका युट्यूब चॅनेलवर डेनिअलचा प्लँक करतानाचा व्हिडीओ शेअर करण्याता आला आहे. त्याचा हा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी या व्हिडीओला कमेट्सही केल्या असून, त्यामध्ये डेनिअलचं कौतुक करण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोबाईल नंबर मागितला म्हणून तरूणीने तरूणासोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क बदक माणसांप्रमाणे बोलतोय, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

कोब्राची शेपटी धरायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

न्यूज वेबसाईट, यूट्यूब चॅनेल्सना सरकारी जाहिराती सुरु करा; भाजपच्या सुनील मानेंची मागणी

पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…