मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकारही या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. रविवारी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. आता अर्जुन कपूर पाठोपाठ त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोरादेखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झालं आहे.
सध्या मलायका अरोरा ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ हा शो करत आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’च्या सेटवर सात ते आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यामुळे मलायका अरोराची देखील कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी दरम्यान मलायकाही कोरोना संक्रमित असल्याचं समजलं. ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’च्या सेटवरील अनेकांना कोरोना झाल्यानं शोचं चित्रीकरण तातडीनं थांबवण्यात आलं आहे.
तसेच मलायकानं माध्यमांशी बोलताना तिला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यामध्ये कोरोनाची अजूनही लक्षण दिसत नाहीत. यामुळे मी सध्या होम क्वारंटाईन आहे. मी लवकरच बरी होईन आणि पुन्हा मजबूत होईन, असं मलाईका अरोरा माध्यमांशी बोलताना म्हटली आहे.
मलाईकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यालाही कोरोनाची लागण झाल्यानं तो सुद्धा होम क्वारंटाईन झाला आहे. अर्जुन कपूरने स्वतः सोशल मिडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवणं ही माझी जबाबदारी आहे. मात्र, सध्या माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत आणि मी एकदम ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी ठीक होईपर्यंत पूर्णपणे आयसोलेशनमध्ये राहणार आहे. माझ्या आरोग्याबद्दल तुम्हाला माहिती देत राहील. या अनिश्चित स्थितीच्या काळात माणुसकीच या व्हायरसला हरवू शकेल असा मला विश्वास आहे,’ असं अर्जुन कपूर याने म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलाईका ज्या अपार्टमेंटमध्ये राहते त्या अपार्टमेंट मधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं मुंबई महापालिकेनं ते अपार्टमेंटही सील केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांत प्रकरणी डाव फिरला! ‘या’ व्यक्तीनंही दिला रिया विरुद्ध जबाब म्हणाला…
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ठार करेनच पण ‘मातोश्री’सुद्धा उडवून टाकेन”
सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रिया चक्रवर्ती स्वतः अटकेसाठी तयार
जम्बो कोविड सेंटरनं माणसं अक्षरशः तडपडून मारली; एक काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव
‘मी तर अडकेनच पण तुम्हा सर्वांनाही अडकवेन’; रिया चक्रवर्तीची ‘या’ व्यक्तिला धमकी