मुख्यमंत्री झाल्यावर ‘मातोश्री’वर राहणार की ‘वर्षा’ त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही वर्षावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार का?” असा प्रश्न विचारला असता, मी वर्षावर फक्त कामासाठी जाणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीत त्यांनी आरेला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला.

मातोश्रीबद्दल मी काही वेगळं सांगणार नाही. मातोश्रीचं महत्त्व काही वेगळं आहे. पण एखादी जबाबदारी घेतल्यानंतर ती पार पाडण्यासाठी जे गरजेचं असतं म्हणजेच जनतेला भेटणं किंवा इतर ज्या काही गोष्टी त्या मी करणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, वर्षावर जेव्हा जेव्हा कामासाठी जाणं गरजेचं आहे. तेव्हा मी तिथे जाणार, असें उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-