कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण

लंडन | मागील वर्षी सर्वकाही सुरळीत चालू असताना जगावर कोरोनाचं संकट उद्भवलं. चीनमधून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्यानंतर हळुहळू कोरोनाने पुर्ण युरोपला आपल्या विळख्यात घेतलं.

युरोपनंतर अमेरिका आणि अफ्रिकामध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्यानंतर भारतात देखील कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. त्यानंतर आता जवळजवळ जगातील कानाकोपऱ्यात कोरोनाचा प्रसार झालेला पहायला मिळतो.

अशातच कोरोनाचं संकट पुर्णपणे संपलेलं नाही तोपर्यंतच आता युरोपात एका नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे इंग्लंडसोबत इतर युरोपियन देशात चिंतेचं वातावरण आहे.

मध्य इंग्लंडमधील एका पोल्ट्री फार्ममध्ये एक अत्याधुनिक एच 5 बर्ड फ्लूच्या कोंबड्या आढळल्या आहेत. इंग्लंडच्या कृषी मंत्रालयाने या बद्दलची माहिती दिली आहे. एच5 बर्ड फ्लूच्या संक्रमित कोंबड्या आतापर्यंत आढले नाहीत, त्यामुळे इंग्लंड सरकार याबद्दल गांभिर्याने विचार करत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार काही संक्रमित कोंबड्या वार्विकशायर भागातील अल्सेस्टर जवळील एका पोल्ट्री फार्ममध्ये आढळले. आता या सर्व संक्रमित कोंबड्यांना मारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

पूर्व स्कॉटलंडमध्ये काही ठिकाणी कोंबड्यामध्ये आणि मध्य इंग्लंडमध्ये एका पक्ष्यामध्ये एच 5 एन 1 विषाणू आढळला होता. त्यानंतर पोल्ट्री फार्म आणि कोंबड्यांची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बायोसिक्युरिटीचे निर्बंध लागू करण्यात आहेत.

इंग्लंड आणि पोलंडमध्ये सध्या बर्ड फ्लूचं संकट आणखी वाढताना दिसत आहे. एकट्या पोलंडमध्ये 6 लाख 50 हजार कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

फ्रान्स, जर्मनी, डेनमार्क, इटली आणि नेदरलॅंड्स यांसारख्या देशांमध्ये गेल्या आठवड्यापासून बर्ड फ्लूने हाहाकार माजवल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सरकार देखईल कडक पाऊले उचलताना दिसत आहेत.

बर्ड फ्लूच्या संकटामुळे अफ्रिका आणि आशियामध्ये देखील मोठं संकट उभं राहिलं होतं. अशातच आता एच 5 बर्ड फ्लूच्या नव्या संकटामुळे आता वैज्ञानिकांचं देखील टेन्शन वाढलंय.

महत्वाच्या बातम्या- 

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी

बहुप्रतिक्षित ‘Maruti Suzuki Celerio’ उद्या बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत

खवय्यांना महागाईचा दणका! हाॅटेलचं जेवण तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

“नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर…”