मुंबई | मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यापैकी मराठमोळा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या हटके सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच तो सर्वांचे लक्षवेधून घेत असतो.
नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसिरीज या सगळ्यांमध्ये काम करून नावलौकिक मिळवलेला अमेय सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अमेयची मी वसंतराव हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनेकांनी चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
अमेयने नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या व्हिडीओत अमेय हा गाडीत बसून ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील एक गाणं म्हणताना दिसत आहे.
एखाद्या शास्त्रीय गायकाप्रमाणे हातवारे करत गाणं म्हणताना दिसत आहे. मी वसंतरावचा तिसरा आठवडा सुरु झाला आहे. लवकर बघा, असं अमेय कॅप्शनमध्ये म्हणतो आहे.
कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की मराठी गाण्यांवरच चांगले reels बनवता येतात, असं अमेयने म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या या अनोख्या अंदाजाला पसंती देखील दर्शविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“शरद पवार भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, हकालपट्टी झाल्यावर…”
ही दोस्ती तुटायची नाय! LIVE सामन्यात पोलार्डने घेतलं ड्वेन ब्राव्होचं चुंबन; पाहा व्हिडीओ
“पोलिसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवावी”
“अमोल मिटकरी म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं लेकरू”
मोठी बातमी! राणा दाम्पत्यांना पोलिसांकडून नोटीस जारी