“शरद पवार भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, हकालपट्टी झाल्यावर…”

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली होती. हिमालयात जाण्याच्या वक्तव्यावरून रणकंदन पेटलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे.

पक्षाच्या विचारसरणीवर बोलायचं नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टावाळी करून दिवस ढकलणे जयंत पाटील यांनी बंद करावं, असंही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी हे सांगावं की, शरद पवार 1978 साली काँग्रेसच्या तिकीटावर आणि भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले तो खरा काँग्रेस पक्ष की, काँग्रेस आय हा मुळचा पक्ष होता?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

1999 साली ज्यावेळी शरद पवारांची हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर त्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो काँग्रेस पक्ष म्हणायचा का?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

इंडियन नॅशनल काँग्रेस नावाचा आणखी एक पक्ष आहे. मग नक्की कोणत्या काँग्रेस पक्षाने नाव बदललं नाही?, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

थापा मारण्याचा उच्चांक गाठताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपचा जन्म होऊन 50 वर्ष झाली नाही. त्यावरून देखील चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना खडे बोल सुनावले आहेत.

दरम्यान, हिंदूत्वाची कुचेष्ठा करणाऱ्यांनी काहीही टिंगल केली तरी आम्ही 5 हजार वर्षांची परंपरा सोडणार नाही, अस रोखठोक प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ही दोस्ती तुटायची नाय! LIVE सामन्यात पोलार्डने घेतलं ड्वेन ब्राव्होचं चुंबन; पाहा व्हिडीओ

“पोलिसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवावी”

“अमोल मिटकरी म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं लेकरू”

मोठी बातमी! राणा दाम्पत्यांना पोलिसांकडून नोटीस जारी

  “भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार लागतात”