मुंबई | मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केंद्रीय तपास यंत्रणा तैनात करून राज्य सरकार आणि नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या भाजपशी दोन हात करण्याचा एकमताने निर्णय घेतला.
कालच्या ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यानंतर आज त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सांगितलं की, ‘आम्ही एकत्र लढू.’
केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईने आपण खचून जाऊ नये, तर एकत्रितपणे त्याचा मुकाबला करू आणि सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना तोंड देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि त्यांच्या पत्नी रश्मी यांचे बंधू असलेल्या श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत ईडीने ठाणे येथील त्यांच्या 11 सदनिका जप्त केल्या.
या सदनिका श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या आहेत. ही कंपनी श्रीधर पाटणकर यांची आहे. जप्त करण्या आलेल्या मालमत्तांची एकूण किंमत अंदाजे 6 कोटी 45 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!
“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता”
अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले…
मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; शूटिंग संपवून घरी येताच ‘या’ अभिनेत्याचा मृत्यू
“आम्ही सत्तेत बसवायचं आणि तुम्हीच आमच्यावर अन्याय करायचा”