कोल्हापूर | निवडणुकांच्या तोंडावर करुणा शर्मा यांनी निवडणूक लढण्याची घोषणा करताच धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी त्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केलेत.
धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या. त्यांना पुढे निवडणुकांमध्ये मोठ्या अडचणी येणार आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक लढवण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी एक वेगळा शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या. त्यामुळे धनंजय मुंडेंना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही, असाही आरोप यावेळी त्यांनी केला.
दरम्यान, करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी लवकरच मराठीत येणार असून त्याच्यावर सध्या काम सुरू आहे.
करूणा शर्मा यांनी केलेल्या या आरोपामुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता”
अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले…
मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; शूटिंग संपवून घरी येताच ‘या’ अभिनेत्याचा मृत्यू
“आम्ही सत्तेत बसवायचं आणि तुम्हीच आमच्यावर अन्याय करायचा”
लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!