मंत्र्यांची खाती काढल्यानंतर ठाकरे सरकारने उचललं आणखी एक मोठं पाऊल!

मुंबई | राज्यपालांनी ठाकरे सरकारने (Thackeray government) गेल्या काही दिवसांत घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांची माहिती मागवली असतानाच आता ठाकरे सरकारनेही एक मोठं पाऊल उचललंय.

गेल्या महिन्याभरात बंडखोर आमदारांनी घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री कायार्लयाने सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महिन्याभरातील सर्व फायली जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने शिंदे यांच्या कार्यालयाला दिला. एकनाथ शिंदे यांनी 1 जूनपासून मंजूर करून घेतलेल्या नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व फाईल्स तातडीने जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता या मंत्र्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची तपासणी होईल, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय.

मुख्यमंत्र्यांनी बंडखोर नेत्यांकडे असलेल्या खात्यांचा पदभार आपल्या गटातील आमदारांकडे सोपवला.  शिवसेनेचे 9 मंत्री सध्या शिंदे गटात आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यांचं फेरवाटप मुख्यमंत्र्यांनी केलंय.

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहावीत. तसेच पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पडावीत. या हेतूने शिंदे गटातील पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ, महाराष्ट्राला दाखवून द्या की…” 

संजय राठोड बंडखोर होताच शिवसैनिक भडकले, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा 

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा 

“विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार, तोपर्यंत बंडखोर आमदारांनी…” 

‘हा विजय म्हणजे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया