“दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ, महाराष्ट्राला दाखवून द्या की…”

मुंबई | विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि राज्याच्या राजकारणात भूकंप आला. शिवसेनेचे 39 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. तसेच आता एकनाथ शिंदे गटाकडे विलिनीकरणाची वेळ आली, तर मनसेचा पर्याय आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूये.

राज्यात सुरु असलेल्या या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, असं मत रुपाली पाटील- ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे. त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या.

दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. आणि महाराष्ट्राला दाखवून द्यायचं की होय आम्ही बाळासाहेबांची पोरं आहोत. आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही. हा इशारा भाजपाला देणं गरजेचं आहे, असं रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

या सर्व राजकीय घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन देखील केल्याची बातमी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत दोनदा राज ठाकरेंना फोन केला आहे. यावेळी राज यांच्या प्रकृतीसोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली.

दरम्यान, राजकीय सत्ता संघर्षात मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेची वेट अ‌ॅँड वॉचची भूमिका आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

संजय राठोड बंडखोर होताच शिवसैनिक भडकले, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा 

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा 

“विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार, तोपर्यंत बंडखोर आमदारांनी…” 

‘हा विजय म्हणजे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण