मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर, बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना हात दाखवला ,यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गळ्याभोवती पट्टा होता. मुख्यमंत्री यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे देखील गाडीत होते.
उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबरला स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी काही दिवस विश्रांती घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन बैठका आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम सुरु केलं होतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी स्पाइन सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना 2 डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवरून भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावा, अशी भूमिका मांडली होती.
महत्वाच्या बातम्या-
“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये”
युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन
‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य
मोबाईल नंबर Block केल्याचा आला राग, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं
आज 73 वा प्रजासत्ताक दिन, संपूर्ण राष्ट्र साजर करतं सणासारखा उत्सव