“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये”

मुंबई | हे सरकारी ऑफिस आहे कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. ही खासगी मालमत्ता आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नगरविकास खात्यात जाऊन काही फायली तपसाल्या. फायली चेक करत असल्याचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

नगर विकास खात्यातील अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

किरीट सोमय्यांना कोणत्या अधिकारात नोटीस बजावली याचा खुलासा करा, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सरकारला दिलं आहे.

किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कोणत्या अधिकारात देता. ते छायाचित्रं प्रसिद्ध झालं, ते नेमकं कुणी काढलं हे तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तेच तक्रारदार आहेत. त्यामुळे ही मिलीभगत आहे. एकीकडे चोरी करायची आणि ती उघड करण्याचा कणी प्रयत्न केला तर त्याला बदनाम करायचं हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या सरकारचं डोकं फिरलं आहे. अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे कोणत्याही ऑफिसात जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार सामान्य माणसाला मिळाला आहे. तोच अधिकार किरीट सोमय्यांनी बजावला. कागदपत्रे तपासताना ऑफिसमधील खुर्चीवर बसण्याचाही अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे. कुणाच्या बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये. मी जाणीवपूर्वक बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये असा शब्द वापरत आहे. कारण ही खासगी मालमत्ता आहे, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन 

‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मोबाईल नंबर Block केल्याचा आला राग, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं 

आज 73 वा प्रजासत्ताक दिन, संपूर्ण राष्ट्र साजर करतं सणासारखा उत्सव 

राष्ट्रवादीने फोडला काँग्रेसचा गड! तब्बल 27 नगरसेवकांची काँग्रेसला सोडचिठ्ठी