भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन

नवी दिल्ली | भारतात बलात्कार आणि दहशतवादाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतातील या प्रकरणांच्या चर्चा आता जागतिक पातळीवर देखील होऊ लागल्या आहेत. म्हणूनच अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतामध्ये येण्यापूर्वी विचार करण्यास सांगितलं आहे.

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण फार झपाट्याने वाढत असल्याने अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलने एक नोटीस काढली. या नोटीसद्वार भारताला लेव्हल 3 अॅडव्हायझरीमध्ये ठेवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात प्रवास करण्यापूर्वी नागरिकांना पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला गेला.

तसेच या नोटीसमध्ये युएस स्टेट डिपार्टमेंटने म्हटलं आहे की, FDA मान्यता मिळालेल्या लसीने तुम्ही लसीकरण पूर्ण केले असल्यास तुम्हाला कोव्हीड 19 ची लागण होण्याचा आणि लक्षणे दिसण्याचा धोका कमी होऊ शकतो. परदेशात जाण्यापूर्वी सीडीसीच्या विशिष्ट शिफारशींचा विचार करा.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या या नोटीसनंतर बायडन प्रशासनाने आणखी एक नोटीस काढत भारतात दहशतवाद आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं म्हटलं आहे.

भारतात जम्मू कश्मिरमध्ये दहशतवादाच्या घटना वाढत आहेत. तसेच महत्वाच्या पर्यटन ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याने भारतामध्ये जाण्यापूर्वी विचार करावा, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.

‘अमेरिकन नागरिकांनी दहशतवाद आणि नागरी अशांतता लक्षात घेता जम्मू आणि काश्मिर राज्यात प्रवास करु नये. भारत पाकिस्तान सीमेच्या 10 किमी आत जाऊ नका, कारण इथे सशस्त्र उठाव होण्याची शक्यता आहे.

लैंगिक अत्याचारासारखे हिंसक गुन्हे याठिकाणी घडले आहेत. यामुळे भारतात जाण्यापूर्वी पुन्हा विचार करा’, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये” 

युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन 

‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मोबाईल नंबर Block केल्याचा आला राग, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं 

आज 73 वा प्रजासत्ताक दिन, संपूर्ण राष्ट्र साजर करतं सणासारखा उत्सव