किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

मुंबई | भारतीय क्रिकेट संघ सध्या मोठ्या बदलातून जात आहे. भारताचा सर्व प्रकरातील कर्णधार विराट कोहलीनं आपल्या सर्व कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. परिणामी आता भारताच्या कसोटी कर्णधार म्हणून कोणाची निवड होणार ही चर्चा आहे.

भारताच्या वनडे आणि ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी सलामीवीर रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. पण विराटनं अचानकपणे कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानं आता हे पद रिक्त झालं आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सलग 6 वर्ष झालं अव्वल स्थानावर विराजमान आहे. परिणामी येणाऱ्या कर्णधाराला तो भार स्विकारावा लागणार आहे.

विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधार म्हणून 2014 साली नियुक्त झाला होता. त्यावर्षी भारतीय कसोटी संघ क्रमवारीत 6 व्या स्थानावर होता पण नंतर विराटच्या नेतृत्वात संघानं प्रचंड मोठी कामगिरी केली आहे.

विराटनं देशाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होण्याचा मान मिळवला आहे. जगात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा क्रमवारीत विराट चौथ्या स्थानावर आहे. अशात आता विराटचा उत्तराधिकारी म्हणून भारतीय संघाचा सलामीवीर के एल राहुलच्या नावाची चर्चा आहे.

के एल राहुल सध्या भारतीय वनडे आणि ट्वेंटी संघाचं उपकर्णधार आहे. त्याचं वय सध्या 29 असल्यानं भारतीय संघ व्यवस्थापन सध्या राहुलकडे दिर्घकालिन पर्याय म्हणून पहात आहेत. पण रोहित शर्मा हा या कर्णधारपदाचा मजबूत दावेदार आहे.

रोहित शर्मा हा सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचा कर्णधार आहे. परिणामी त्यांच्याच खांद्यावर कसोटी संघाची जबाबदारी बीसीसीआय देण्याची शक्यता आहे. अशात के एल राहुल देखील एक सर्वोत्तम पर्याय आहे अशी चर्चा आहे.

बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी के एल राहुल यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. के एल राहुल हा भारताचा नवा कसोटी कर्णधार असू शकतो, असं जगदाळे म्हणाले आहेत.

दरम्यान, भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत निवड समिती लवकरच निर्णय घेणार आहे. अशात आता निवड समिती रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात कोणाची निवड करते ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?” 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार

‘…म्हणून ते हे सगळं करतायेत’; शिवसेना नेत्याने अभिनेता किरण मानेंना फटकारलं