IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

मुंबई | IPL 2022 मेगा लिलावात  12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. येत्या सर्वाधिक बोलीचा (IPL 2022 Mega Auction) विक्रम मोडला जाऊ शकतो.  कोणत्या खेळाडूला सर्वाधिक बोली लागणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावलं जात आहेत.

यंदा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरणार याकडे आयपीएलप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये 10 संघ भिडणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन संघांना आयपीएलमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

मागील IPL म्हणजेच IPL 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सच्या संघाने 16.25 कोटींना खरेदी केलं होतं. मात्र, यावेळी मोठा लिलाव होणार असल्याने कोणत्या खेळाडूवर बोली लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आयपीएलमध्ये आठऐवजी दहा संघ बोली लावतील. तिथे यावेळी बोलीची मर्यादाही 85 कोटींवरून 90 कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा स्थितीत सर्वाधिक बोलीचा विक्रम मोडीत निघेल, अशी अपेक्षा आहे.

दिल्लीच्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं आहे. आता त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. अहमदाबादचा संघ श्रेयस अय्यरला घेण्याच्या तयारीत आहे. त्याला संघाचा कर्णधार देखील केलं जाऊ शकतं.

पंजाब किग्जने यंदा स्टार फलंदाज के एल राहुलला (KL Rahul) रिलीज केलं आहे. त्यामुळे के एल राहुलवर देखील मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. लखनऊचा संघ राहुलला घेण्याच्या तयारीत आहे. त्याला लखनऊच्या संघाचा कर्णधार देखील केलं जाऊ शकतं.

सनराईजर्स हैदराबादला आयपीएल कप जिंकवून देणाऱ्या डेव्हिड वाॅर्नरला (David Warner) देखील रिलीज करण्यात आलं आहे. डेव्हिड वाॅर्नरचा भारतातला रेकाॅर्ड चांगला आहे. त्यामुळे वाॅर्नरवर देखील मोठी बोलू लागू शकते.

मिचल स्टार्कला (Mitchell Starc) आरसीबीने सोडलं आहे. स्टार्क भारतीय पिचवर कमाल करू शकतो. स्टार्क सध्या जबरदस्त फाॅर्ममध्ये आहे, त्यामुळे आता स्टार्कवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईने यंदा रिलीज केलं आहे. हार्दिक सध्या फाॅर्ममध्ये नसला तरी मोक्याच्या क्षणी हार्दिक सामना पलटवू शकतो. त्यामुळे त्यावर मोठी बोलू लागू शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?” 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार