“सरकारन माझ्या भीमा कोरेगावच्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावे”

मुंबई |  विधानसभा निवडणुकीच्या काळात आरेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तत्कालिन सरकारने रातोरात आरेमधल्या झाडांची कत्तल केली होती. यालाच पर्यावरण प्रेमींनी जोरदार विरोध दर्शवला होता. त्यावेळी सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र नव्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सरकारकडे नवी मागणी केली आहे.

आरेचा विषयी मार्गी लागला आता भीमा कोरेगावमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे मागे घेण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ट्वीट करून त्यांनी ही मागणी केली आहे.

आरेसाठी आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. ते आंदोलक सुटले. भीमा कोरेगावमध्ये मागील सरकारने खोटे गुन्हे दाखल केले. आता माझ्या या सरकारने ते गुन्हे मागे घ्यावेत. होय हे आपलं सरकार, असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, रविवारी सकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी आरेच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी दखल घेत रविवारी संध्याकाळी लगोलग पत्रकार परिषद घेत गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा केली. आता भीमा कोरेगावमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे मुख्यमंत्री मागे घेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-