मॉब लिंचिंगविरोधात 49 कलाकारांचं पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली : देशात होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ‘जय श्री राम’चा नारा हा मुस्लिमांवर हल्ला करण्यासाठी वापरला जातं आहे. त्यामुळं सिनेसृष्टीतल्या एकूण 49 जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं आहे.

‘जय श्री राम’च्या घोषणांचा वापर करुन दलित आणि मुस्लिमांवर हल्ला होतं आहे. ते हल्ले रोखा, असं या पत्रात कलाकारांनी नमूद केलं आहे.

मॉब लिंचिंग प्रकरणी सिनेसृष्टीतल्या 49 कलाकारांनी मोदींना पत्रात आवाहन केलं आहे. मॉब लिंचिंग प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. 

संयुक्त राष्ट्रातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. देशभरात जमावाने कायदा हातात घेत हत्या केल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी मॉब लिंचिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकड करण्यात आली आहे.

आपलं संविधान एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक राज्य असल्याचं सांगते. संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे जगता यावं यासाठी मॉब लिंचिंगसारख्या घटना थांबवल्या पाहिजेत, असं मोदींना लिहलेल्या पत्रात लिहलं आहे.

मनिरत्नम, अनुराग कश्यप, कौशिक सेन, केतन मेहता, रामचंद्र गुहा अशा एकूण 49 जणांनी मोदींना दिलेल्या पत्रावर सह्या केल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-असला कसला विश्वविजेता?; आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचा संघ अवघ्या 85 धावात गारद

-मराठा मोर्चाचं राजकारण करणाऱ्याला धडा शिकवू; निवडणूक लढण्यावरुन मोर्चात वाद

“एक दिवशी भाजपला कळेल प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही”

-निवडकर्त्यांचं काम लोकांना खूश करणं नाही- सौरभ गांगुली