औरंगाबाद महाराष्ट्र

अटलजींच्या शोकप्रस्तावाला विरोध; ‘एमआयएम’च्या नगरसेवकाला बेदम चोपलं

अटल बिहारी वाजपेयी यांच्या शोकप्रस्तावाला विरोध करणं एमआयएमच्या नगरसेवकाला चांगलंच महागात पडलं. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मिळून या नगरसेवकाची चांगलीच धुलाई केली. सय्यद मतीन असं या नगरसेवकाचं नाव आहे. 

औरंगाबाद महापालिकेत भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांचा शोक प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सय्यद यांनी विरोध केला. सय्यद यांचा विरोध पाहून भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक चांगलेच भडकले. 

भर महापालिकेत खडाजंगी पहायल मिळाली. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी सय्यद यांच्याकडे धाव घेतली. तसेच त्याना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

सय्यद यांच्या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. बरा चोप दिला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात दिल्या जात आहेत. 

IMPIMP