“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”

मुंबई | राज्यातील दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये वाईन (wine) विक्री करण्यास राज्यमंत्री मंडळाने परवानगी दिली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं होतं.

भाजपसह इतर अनेक पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.

राज्यमंत्री मंडळाने मंजुर केलेल्या नव्या वाईन विक्रीच्या धोरणाला खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वतः फोडणार, अशं जलील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मी हे करणार असल्याचं ओपन चॅलेंज त्यांनी यावेळी दिलं आहे.

शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. मग चरस आणि गांजाही शेतातच येतात. त्यालाची परवानगी द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

आया बहिणींनी पुठं येऊन ही वाईनची दुकानं फोडली पाहिजे, असं आवाहन जलील यांनी यावेऴी महिला वर्गाला केलं आहे.

भाजप, काँग्रेस या निर्णयाविरोधात फक्त निंदा करतायत, मात्र आम्ही कृती करू, असं थेट इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाईन विक्रीचा हा मुद्दा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं

 अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…” 

देशात नवीन राष्ट्रपिता तयार होतोय, त्याचं नाव नथुराम गोडसे- तुषार गांधी 

भारतासाठी गुड न्यूज; कोरोनाबाबत ही महत्वाची माहिती समोर