मुंबई | कोरोना (Corona) काळात सर्वकाही बंद ठेवण्यात आलं होतं. शाळा, महाविद्यालये देखील बंद होती. सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात होत्या.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. आता कोरोना रूग्णसंख्या वाढत असली तरी परीक्षा पद्धत बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अशातच आता परीक्षा ऑनलाईन घ्यावी यासाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, यासाठी आता विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन का घेतल्या जात आहेत, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय. त्यानंतर मोठा राडा झाला.
शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून त्यातील काही विद्यार्थ्यांनी बसवर हल्ला केला. काचा फुटल्या. आंदोलन हिंसाचाराकडे वळत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी लाठीचार्ज केला.
पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे आता धारावीत वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, सोशल मीडियावर देखील 10वी आणि 12 वीच्या परीक्षेवरून मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता पोलिसांची सोशल मीडियावर देखील नजर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”
परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं
अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…
“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…”
देशात नवीन राष्ट्रपिता तयार होतोय, त्याचं नाव नथुराम गोडसे- तुषार गांधी